रेताड, उदासी मन माझें
बेरंग, निरस जग सारे
भटकून दुनिया सारी, तरीही मी एकटा रे
अल्लड मनाचा मी असा का रे ?

पण, ती

आली हळूच, चोर पावलांनी
हृदय घेऊन पसार झाली,
तिला शोधण्यात मी हरवून गेलो
अल्लड मनाचा मी असा का रे ?

कधी,
उगाचच बालिश हट्ट करते,
प्रसंगी, मायेने जवळ घेते 
या तिच्या नवकला मला कधी कळतील का रे
अल्लड मनाचा मी असा का रे ? 


तुझ्याच प्रेमाने जग माझे रंगुनी टाकले,
स्वप्न देखील रोज तुझीच वाट पाहू लागले,
तुझ्याच आठवणीत मी इतका व्याकुल का रे
अल्लड मनाचा मी असा का रे ? 

फक्त तुझसाठी