धुळीच्या साम्राज्याप्रमाणे माझे ते जीवन होते
पण तुझ्या येण्याने मात्र ते धूलिकण ही नष्ट झाल्यागत वाटे

आता उरली ती  फक्त स्वच्छ सुंदर आणि निर्मळ हवा
तू माझ्यात असल्याने मी घेतला जन्म तो नवा

कधी खट्याळ मुलगी बनतेस कधी बालिशपणा दाखवते
पण वेळ येते जेव्हा खरी तेव्हा आईसारखी समजावतेस

हात तुझा हाती असताना विसर पडतो मला जगाचा
मी तुझ्यात असाच हरवू हाच मानस माझ्या मनाचा

मन कसे लगेच थांबते विचारांचे झरे ही स्तब्ध होतात
सहवासात तुझ्या असतो तेव्हा हृदयाची स्पंदने ही पार थांबतात

माहीत आहे मला तुझं माझ्यापेक्षा थोडं जास्त आहे
म्हणून सांगतो कवितेतून हा प्रेमवेडा फक्त तुझाच आहे


सोनलमाया


Image Credit 

unsplash-logoShelby Deeter