तानाजी मालुसरे कदाचित आपल्या सर्वांसाठी त्या चौथी च्या इतिहास पुस्तकां पुरतीच मर्यादित होते. त्यातले ते काही खास संवाद "गड आला पण सिंह गेला " "आधी लग्न कोंढाणा च मग रायबा च" असेच काही ते संवाद. पण त्यावेळी कदाचित ते संवाद आपण परीक्षेत गुण मिळवण्यासाठी पाठ केले असावेत.
पण आज तानाजी चित्रपट पाहिला आणि छत्रपती शिवरायांच्या महान पठ्ठ्यानी केलीली धडाकेबाज कामगिरी अंगावर शहारे आणून गेली. एक थरारक अनुभव आणि खरी लढाई पाहण्यास मिळाली अस मी म्हणेल.

सुभेदार तानाजी मालुसरे

निधड्या छातीचे,पिळदार शरीयष्टी असणारे निडर योद्धा तानाजी. स्वतःच्या मुलाचं लग्न असून सुधा निव्वळ स्वराज्यासाठी प्राधान्य देणारे मातीशी प्रामाणिक असणारे तानाजींनी गाथा म्हणजे आताच्या लग्न सराईत छोट्या छोट्या गोष्टीवरून जी निरर्थक भांडण होत असतात त्याच्या थोबडा वर मारलेली जोरदार चापटी म्हणावी लागेल.ते अवघड किल्ले, ना कोणती आधुनिक साधने ना कोणत तंत्रज्ञान पण तरीही स्वराज्यासाठी लढत राहणं खरच आपण त्यांच्या कडून शिकले पाहिजे. स्वतःच्या स्वार्था पायी कित्येक कट रचणारे आजचे राजकारणी त्यांनी खरच महाराज आणि त्यांच्या मावळ्यांकडून एक सच्चा देशभक्त कोण असतो ह्याचे धडे गिरवले पाहिजे. आपल्या राजाच्या प्रती असलेली निष्ठा आणि त्यासाठी सर्वकाही वाहून देणं आताच्या पिढीला खरच लाजवण्या गत म्हणावं लागेल.

स्वतःवर विश्वास ठेऊन आपण आयुष्यात कुठलीही अशक्य गोष्ट शक्य करू शकतो हेच तानाजी हा चित्रपट शिकवतो.

एका बाई साठी तिचा नवरा हा किती बहुमोल असतो परंतु स्वराज्यासाठी स्वतःच्या कुंकवाची परवा न करता आपल्या प्रिय नवऱ्याला आत्मविश्वास देणाऱ्या सवित्रीलाही तितकंच शुरूविर म्हणावं लागेल.

आज भाऊ भाऊ शुल्लक कारणास्तव तुटत चाललेलं आपण पाहत असतो मात्र ते हरहुन्नरी मावळे केवळ आपल्या राज्य आणि स्वराज्यासाठी किती निष्ठावान होते हे खरच कौतुकास्पदच म्हणावं लागेल.जरा काही अडचणी आल्या की गूगल करणारे आपण अजिबात युक्त्या लढवत नाही पण तेव्हा तंत्र तंत्र नसतानाही चलाख बुद्धी वापरून शत्रूशी दोन हात कसे करावे हे खरच त्या सर्वच मावळ्या आणि राज्यांकडून शिकण्यासारखं आहे.

आजचे लालची राजकारणी आणि त्यांची मंडळी जराशाच कारणावरून पक्षांतर करताना दिसतात त्यांनी नक्कीच ह्या साऱ्या कडून एक आदर्श घ्यायला हवाच.
तानाजी जाऊन आज ४ शतके पालटली मात्र ते अगदी शेवटपर्यंत हृदयात राहतील ह्यात शंका नाही.

फक्त एकच सांगावेसे वाटते तानाजी आज तुमच्या सारखे सरदार नसते तर आजही आम्ही कुठेतरी गुलाम म्हणून गुलामगिरी चे जीवन जगत असतो.आम्हाला आमचं स्वतंत्र नसतंच.

खूप खूप आभार तुम्ही आम्हाला इतकं सुंदर स्वराज्य दिलात.


Image Credit