तू मज मिळसी असा
सखा आयुष्यभराचा 
नव्हते ध्यानी मनी कधी
होशील माझा तू  शत जन्माचा

वाटले नव्हते सुखाचे असे 
हिंदोळे दूरवर वाहतील कधी
नव चैतन्याचा सुखद वारा
मी सहज हळुवार झेली 

हात माझा हाती धरुनी
तुला दूरवर चालायचे होते
तुझे एकटे पण दूर सारूनी
तुला मला आपलेसे करायचे होते

नकळत ते तुझे माझे
जगणे कसे एकजीव झाले
काही क्षणिक काळातच
तुझ्या प्रेमाने तुडुंब न्हाले

आभार शंभू चे मानण्यास 
पुन्हा जन्म घ्यावासा वाटतो
प्रत्येक जन्मी तुझ्याच मांडीवर
शेवटचा श्वास सोडावसा वाटतो
Image Credit 

unsplash-logoRyan Holloway