सकाळी रोजच्या नकोशा वाटणाऱ्या कामाला जायला निघाले आणि ट्रेन मधे बसले तेव्हा कोणीतरी चटकन तिळगुळाच पिशवी पुढे सारात तिळगुळ घ्या गोड गोड बोला अस म्हणाल.

 मला चटकन माझं बालपण आठवलं.

ते थंडीचे दिवस, चुलीवर तापवायला ठेवलेले पातेले, तीळगुळ चां खमंग वास आणि वाफवलेल्या कोरफड ( आजी त्याला रामाचं फळ ही म्हणायची ).

कुडकुडणाऱ्या थंडीत सुधा तेव्हा उठायचं आणि नवे कपडे घालून सर्वांच्या घरी ताटात छोटे छोटे तीळ गूळ घेऊन घरतल्या प्रत्येक माणसापर्यंत पोचवून यायचो. 
किती मजा यायची तेव्हा आम्ही आळी त सर्व एकत्र जमून प्रत्येकाच्या घरी जायचो. एक गोडवा वाटायचे. प्रत्येकाला एक गोडवा देत फिरायचो. ते वय जरी अल्लड असले तरी किती छान होत ते सारं.

आज तो गोडवा पुन्हा द्यावासा वाटतो.त्या कुडकुडणाऱ्या थंडीत पुन्हा उठून प्रत्येकाच्या घरी गोडवा घ्यायला व द्यायला जीव तडपडतोय. आज सगळ्यांकडे सर्व काही असूनही तो गोडवा मात्र हरवलेला दिसतोय.

तुझं तू माझं मी हे समीकरण अगदी प्रचलित झाल आहे.

असो जे आहे ती वस्तुस्थिती बदलणारी नाही आहे.तरीही तो गोडवा मिळावा हीच अपेक्षा.


Image Credits 
https://www.thestatesman.com/wp-content/uploads/2020/01/2-10.jpg