बऱ्याच वेळा आपण त्याच्याबद्द्ल बोलत असतो.कधी त्याच्या प्रगती बद्दल तर  कधी त्याच्या उत्कर्षाबद्दल ,कधी त्याच्या नाकर्तेपणा बद्दल तर कधी त्याच्या वाईट सवयींबद्दल कधी त्याच्या श्रीमंती बद्दल तर कधी त्याच्या गरीबीबद्दल.कधी त्याच्या आढमुठेपणा बद्दल तर कधी त्याच्या नकोशा वाटणाऱ्या गोष्टीबद्दल. कधी आपापसात तर कधी चारचौघात कधी मैफिलीत तर कधी एकाकीपणात कधी त्यांच्या घोळक्यात तर कधी त्यांच्या गप्पाटप्पात  तो मात्र नियमित असतो.नियमित  पण नकळत पणे तीचा तो तिच्या ओठांवर रुळलेला  मात्र असतोच. ती त्याच्यापासून कितीही लांब राहिली तरी सारखी त्याच्याच भवती असते.त्याच तिच्या जीवनी असण म्हणजे तिच तिच्याच जीवनी जिवंत असल्यागत असत.त्याच्याविना ती शून्य आहे.त्याच्याविना तीच मूळ  अस्तित्वच नाही.तो आहे म्हणून ती आहे.
 ती असते अशी अफाट किवा मग साधी सरळ.पण त्याच्या येण्याने ती सुखावत असते.तो येण्याच्या आधीही ती उंच भरारीची स्वप्ने पाहत असते मात्र तिच्या स्वप्नांना खरा  वेग  येतो  खरी दिशा मिळते ते तो जीवनी आल्यावरच.मग सुरु होतो नवखा प्रवास नवी स्वप्ने नवी क्षितीज हि असतात सोबतीस तो  ह्यात फक्त एक निमित्त असतो.तिच्या सुखात दुखात त्याच हि सारकाही सामावलेलं असत.त्याच तिच्या  जीवनात असण म्हणजे तिचा साजशृंगार तिच्या चेहऱ्यावर तसेच  अंगाखांद्यावर असण्याला महत्त्व आहे.तिचा तो तिच्या प्रत्येक अवयवातून तिची स्वताबाद्दलची ओळख दाखवतो.तिचा तो हा फक्त तिचा नाही त्यात खोल अर्थ दडला आहे.
तिच्या शेंदूर लावण्यापासून ते पायात जोडवे किंवा केसात गजरा माळण्यापर्यंतच्या तिच्या  अस्तित्वत तो   झळकत असतो. तिच्या गळ्यात असणाऱ्या मंगळसुत्र पासून हिरव्या बांगड्या पर्यंत त्याचा साज आहे आणि  तेच तीच त्याच्या नावाच मंगळसूत्र ही एखाद्या समोरच्याला दाखवणारा अप्रत्यक्षपणे चा हिसका आहे. तिच्यासाठी कोणा परक्या पुरुषाच्या नजरेतून स्वतःला बचावणारे एक शस्त्र आहे.तिच्या  पदराची  गाठ त्याच्या उपरणाला अशी घट्ट बांधून मग सात फेरे घेण ह्यात विशाल अस सामर्थ्य आहे.तिचा तो असण म्हणजे तिची जगासाठीची ओळख आहे.त्याच्या नावच बाळ तिने तिच्या गर्भात रुजवण हा तिच्यासाठीचा तिचाच अभिमान. त्यामुळेच तिला वेगवेगळी नाती भेटत जातात.अगोदर ती एक मुलगी असते पण नंतर तिला अनेक प्रकारच्या नात्यांशी हातमिळवणी करावी लागते. त्याचा हात तिच्या हाती असण म्हणजे एक आधार,त्याच्या छातीवर तिने विसावण म्हणजे संपूर्ण जगाचा विसर पडून एक प्रकारची त्याची माया उपभोगण्यागत आहे.
तो कपाळावर असण हेच तीच तेज आहे.नाहीतर तीची ओळख नुसती निस्तेज आहे.
त्याच्यामुळेच ती बहरते,सुखावते,आनंदाने आनंदाचे हेलकावे घेत असते.तो फक्त एक निमित्त असतो.पण त्याच  निमित्त हेच खर तिच्या आयुष्याच सार असत.त्याच्यामुळे ती मोठी होत असते,त्याच्यामुळे तिच्या कक्षा रुंदावत असतात,त्याच्यामुळे तीचा उत्कर्ष वाढत असतो.तो असतो म्हणून ती असते.त्याचा सहवास असतो म्हणून ती हि भरभरून जगत असते.ती आयुष्यात कितीही पुढे गेली तरी तो मागे असावाच लागतो निदान उंच माझा झोका म्हणताना त्या  झोक्याचे  येरझारे घालताना तो सतत पाठीशी असावाच लागतो.
त्याच्यामुळेच ती ती असते.
फक्त त्याच्यामुळे ती ती असते.
तिच्या जीवनात ओतप्रेत प्रेमाचे रंग भरणाऱ्या तिच्या त्याला समर्पित.
तिचा उल्लेख तिचा उत्कर्ष नेहमी गायला जातो मात्र तिचा तो नकळत कुठेतरी लपलेला असतो तिच्या त्याच्यासाठीच समर्पित.Image Credit 
unsplash-logoJose Chomali