स्वप्न होते पहाटीचे
गुलाबी थंडीने गारठलेले
धुंद होऊनी बरसणाऱ्या
त्या स्वप्नातल्या प्रियकराचे

दूरदेशीच्या प्रियकराची मज
स्वप्नात भेट झाली
सुंदर त्या भेटीमध्ये
मी माझीच न राहिली

त्याचे ते बोलके डोळे
मला मनापासुनी भाळले
अंतरंगात भाव जणू
त्या नाजरेतुनीच कळेले

देहभान विसरुनी सारे
मी त्यात गुंफत गेली
हातात हात घट्ट रोवूनी
बेभान स्वारीवर निघाली

वळणा वळणांच्या स्वारीवर
मी भरभरूनी जगले
फक्त त्याच्या सहवासानेच
प्रेम मनाला अतोनात मिळाले

कानी पडताच हाक आईची
स्वप्न सारे भंगून गेले
पहाटीचे ते क्षणिक स्वप्न
फुलपाखरासारखे उडुनी गेले.