शाळा, नुसता शब्द आठवला तरीही ते निरोप समारंभाचे दिवस आठवतात,ते रोजच जन गण मन आठवत,खेळाचे तास आठवतात,गुलाबी थंडीतली सहल आठवते,त्या लाल रिबीनि, ते निळे कपडे ,ते मोजे,ते  डबे,सारकाही आठवत आणि मग मन पुन्हा रमायला लागत त्या सुंदर  सुखद शाळेत. कुणी मला विचारल ना आयुष्यातला सगळ्यात बेस्ट वेळ कोणता तर तो  माझ्या शाळेत मित्र मैत्रिणीसोबत घालवलेला असेल.किती भन्नाट दिवस होते ते.म्हणजे शाळा तशी साधीच होती पण ती माझी होती,वर पत्र्यांच छप्पर होत आजही आहे,आजही तोच पिवळा रंग आहे आहे मोठ्या अभिमानाने गडद लाल रंगाने कोरलेले नाव “आदर्श प्राथमिक विद्यालय नारिंगी “.

मला शाळेचे ब्रीदवाक्य नेहमी आठवते “प्रज्वलितो ज्ञानमय दीप हा ” ह्या एका दिव्याने जणू माझ्या सारख्या कित्येक विद्यार्थ्याच आयुष्य दिपमय करून टाकलय. माझ्या शाळेने मला खूप छान संस्कार दिलेत जे मला माझ्या नंतर च्या संपूर्ण आयुष्यभर कमी येतील ह्यात शंका नाहीच.माझी शाळा तशी गरीब होती आज त्या शाळेकडे पैसा असावा हि पण खरच त्यातच सर्वकाही होत,आमच्या शिक्षकांनी आम्हाला कधीच कसलीही कमी पडू दिली नाही.तेव्हा अजाण होते मात्र आता चांगलच कळतंय तेव्हा त्या काळी ह्या महान शिक्षकांनी इतक्या कमी पगारात कस बर शिकवलं असाव स्वताच पोट भरत.आता स्वतचा पगार स्वताला पुरत नाही मग ह्या  आहा  लाखमोलाच्या  शिक्षकांना किती तोफांच्या सलामी द्याव्या असा प्रश्न पडतो कधी कधी ?

खरतर त्या शाळेमधेच शिकले होते जे मिळत त्यात समाधान मानून पुढे चालाव.मराठी भाषेचे इतके सुंदर आणि सहज धडे हि त्याच शाळेत शिकले. आज मी जे काही तोडक मोडक लिहितेय किवा ह्यापुढेही लिहीन त्याची खरी प्रेरणा ह्याच मंदिरातून मिळाली मला.कमी पैशातहि कस व्यवस्थापन असाव हे सुधा इथेच शिकले.

१० विला असताना इतका अभ्यास आमच्याकडून करवून घेतला कि सगळे जन आरामात पास झालो होतो आणि ते हि चांगल्या गुणांनी .एकंदरीत काय आमच्या पाठीशी आमच्या पंखात बळ देणारी हि शाळाच होती.आता कितीही गुण मिळाले तरी त्याला शाळेच्या गुणाची सर येत नाही.इथेच आमच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया रचला गेला होता.

आजही त्या शाळेच्या वाटेवरून जाताना एक प्रश्न पडतो कि दुसर्यांना सदैव काही ना काही देत आलेली हि आदर्श् शाळा अजून आहे तशीच आहे.ना इमारत,ना रंग बदलला ,ना रूप बदलले,ना वरचे छप्पर बदलले ना ते नाव बदलले. नाहीतर आपण हाडामासाची माणस किती बदलत असतो ते हि अगदी क्षणोक्षणी.कधीकधी वाटत का वाट चुकली आपली का पडलो ह्या सगळ्यात कुठे येऊन अडकलो आपण सारे ह्या स्वार्थी जगात.

फक्त एकदाच त्या शाळेसमोर नतमस्तक व्हावस वाटतंय आणि ओरडून सांगावस वाटतय तू जी कोणी आहेस फक्त माझी आहेस आणि माझ तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे आणि राहील.

खरच शाळा दिव्य होती आणि असेल, तुझीच आजन्म ऋणी असणारी आदर्श आहे का माहित नाही पण प्रामाणिक  विद्यार्थिनी.