सखे सुसाट तुझी स्वारी अशीच सुरु ठेव
आहे जोवर तेल पणतीत तू अविरत तेव
सखे, तुझ्या जन्माच्या वेळची
परिस्थिती वेगळी असावी
आई वगळता तुझी
कुणास ख़ुशी नसावी
सखे, बंधनांची सखोल कुंपणे
लहानपणा पासून सोबतीला
असे इच्छा जरी दांडगी तुझी
तरी मुरड घातलीस आनंदाला
सखे, हातावरून पाणी सोडले
कि झटकन तू परकी होतेस
कडेवरची लहान पोर तू
एका रात्रीत बाई बनतेस
सखे, डोक्यावरील मानाचा पदर
तू नेटनेटका सांभाळावा
ह्याच सुंदर पदरी मात्र
आशीर्वाद अष्टपुत्राचाच मिळावा
सखे, बंधनांची अवजड तोरणे
आता झटकुणी दे सारी
असल्या वाटा जरी धूसर तुझ्या
तरी वाट शोध तू नवी
सखे, घोळक्यात जेव्हा सगळ्याच्या
तुझी उघड चर्चा रंगताना
तेव्हा दु:ख होते मनी
तुझ्या लाजेचा प्रश्न येताना
सखे, न जुमानता अनिष्ट चर्चांना
न छेडता बोगस बंधनांना
प्रवास तुझा अखंड राहो
सूर्य क्षितीजापलीकडे जाताना
सखे, अभिमान असे तुझा
तुझ्यातल्या सहनशील बाईचा
तुझ्यातल्या निरंतर त्यागाचा
अन तुझ्या सबळ प्रयात्नांचा
म्हनुनच सखे सांगणे माझे
सुसाट तुझी स्वारी अशीच सुरु ठेव
आहे जोवर ताकद धमन्यात
अविरत पणे तेव तू बाई
अविरतपणे तेव
आहे जोवर तेल पणतीत तू अविरत तेव
सखे, तुझ्या जन्माच्या वेळची
परिस्थिती वेगळी असावी
आई वगळता तुझी
कुणास ख़ुशी नसावी
सखे, बंधनांची सखोल कुंपणे
लहानपणा पासून सोबतीला
असे इच्छा जरी दांडगी तुझी
तरी मुरड घातलीस आनंदाला
सखे, हातावरून पाणी सोडले
कि झटकन तू परकी होतेस
कडेवरची लहान पोर तू
एका रात्रीत बाई बनतेस
सखे, डोक्यावरील मानाचा पदर
तू नेटनेटका सांभाळावा
ह्याच सुंदर पदरी मात्र
आशीर्वाद अष्टपुत्राचाच मिळावा
सखे, बंधनांची अवजड तोरणे
आता झटकुणी दे सारी
असल्या वाटा जरी धूसर तुझ्या
तरी वाट शोध तू नवी
सखे, घोळक्यात जेव्हा सगळ्याच्या
तुझी उघड चर्चा रंगताना
तेव्हा दु:ख होते मनी
तुझ्या लाजेचा प्रश्न येताना
सखे, न जुमानता अनिष्ट चर्चांना
न छेडता बोगस बंधनांना
प्रवास तुझा अखंड राहो
सूर्य क्षितीजापलीकडे जाताना
सखे, अभिमान असे तुझा
तुझ्यातल्या सहनशील बाईचा
तुझ्यातल्या निरंतर त्यागाचा
अन तुझ्या सबळ प्रयात्नांचा
म्हनुनच सखे सांगणे माझे
सुसाट तुझी स्वारी अशीच सुरु ठेव
आहे जोवर ताकद धमन्यात
अविरत पणे तेव तू बाई
अविरतपणे तेव
0 Comments