प्रेम शब्द दोनच अक्षरांचा बर का!पण हे आहे म्हणून आपण आहोत ह्या फक्त दुहेरी शब्दात खूप काही दडलंय,खूप काही सामावलंय,खूप काही अडकलय,आणि खूप काही रचलय.महान प्रेमाविषयी बोलणारी मी खरच त्याची व्यापक पणे मांडणी करण्यास समर्थ  आहे कि नाही हे मला माहित नाही पण मग प्रेम अनुभवून त्या उंच झर्यात  तुडुंब न्हावून निघालेली मी त्या प्रेमाच्या ओतप्रेम प्रेमात पार गढून गेलीये.
प्रेम आणि निस्वार्थ प्रेम ह्या त्याच्या दोन बाजू आहेत.एकीकडे फक्त प्रेम आणि एकीकडे फक्त अपेक्षा.मला वाटत प्रेम हे नेहमी निस्वार्थ असाव,मोकळ असाव.त्यात कुठल्याच अपेक्षा नसाव्यात कारण जिथे अपेक्षा येतात तिथे नात कमकुवत होण्यास सुरु होत. आजही आपल्याकडे पितृपक्षाला मेलेल्या माणसासाठी पान आवर्जून ठेवले जाते.जिला कसली अपेक्षा हि नसते गेलेल्या माणसाची  ना अपेक्षा तो माणूस परत येण्याची  ती मात्र न चुकता त्या साठी दरवर्षी पान ठेवत असते.आजकाल प्रेम हे कुठेतरी संपतेय.जो तो स्वताच्या विश्वात रममाण आहे.प्रेमासाठी असा एखाडा सुखद कोपराच नाही उरलाय.उरल्यात त्या फक्त अपेक्षा.
नात्यामध्ये दोघांचाही घालमेल होण आणि दोघानाही तितकच समजून घेण अत्यंत गरजेच आहे.माझच योग्य किवा मीच बरोबर ह्या सर्वामुळे नात्याची अवहेलना होण स्वाभाविक आहे.
प्रेम आयुष्यातल सर्वात मोठ सुख.कुणा एखाद्यासाठी पार वेड होऊन जाण, समोरचा आहे तसा त्याला स्विकारण त्याच्या सुखदुखात स्वतच सुखदुख मानून त्याची सोबत करण .वेळोवेळी त्याला मोलाची साथ देण.तो सोबत नसल्यावरही त्यावर तितकाच जीव लावण.हेच प्रेम असत ना?  
कधी कधी बागेतल्या माळी च तोंडभरून कौतुक करावस वाटत मला काय आहे तो म्हणजे त्या झाडांना आयुष्यभर तो जपणार तोच खतपाणी घालून पोटच्या गोळ्यासारख वाढवणार आणि फुल  फळ आल्यावर मात्र श्रेय त्या बंगल्याच्या मालकाला जाणार. तरीही माळी खूप खुश असतो कारण त्याच  त्याच्या झाडांवर निस्वार्थ प्रेम असत.त्यात कुठल्याही आगळ्यावेगळ्या अपेक्षा नसतात. ना वेगळी वळण असतात.प्रेमाची नाती तुटायचं एकमेव कारण हेच कि आपण खूप काही मिळेल ह्या भावनेने प्रेम करत असतो वास्तविकता हे चुकीचे आहे.प्रेम कधीच अपेक्षित नसत प्रेम हे प्रेम असत.त्यात फक्त प्रेमच यायला हव.काळजी आणि हळवेपणा टिकून राहावा बाकी सगळ त्यावरच सोडून द्यायचं ते आपोआप आपल्याला आपल्या सुंदर ध्येयापर्यंत नेत असत आणि ठणकावून सांगत असत मी प्रेम आहे तुझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग,तुझ्या आयुष्यातला सुखद असा काहीसा माझा मीच.   प्रेम दोघांच असत मग ते दोघांनी मिळून संभाळल पाहिजे.दोघांनी मिळून जपलं पाहिजे.प्रेमापेक्षा वरचढ अस मला तरी अजून काहीच दिसल नाही आजवर.प्रेम हे जपायलाच हव.आणि प्रेम हे द्यायलाच हव.
एक सुंदर  प्रेमरूपी मोर  आलाय जीवनी माहित नाही त्याच्या प्रेमापोटी सर्वस्व देऊ शकेल का पण हा दांडगा विश्वासआहे त्यावर तोच मला त्याची अगदी शेवटपर्यंत साथ देईल आणि माझी मी नावारूपाला येईल निवळ त्याच्या सहवासाने.मोरा तुझ्या  असाच पिसारा फुलवण्याने  आपल्या दोघांच्या आयुष्यात सुखद हास्य पसरावे आणि तुझ्या फुलण्याने  हे सुंदर आयुष्य हि असच फुलत बहरत जावे हीच त्या महान देवापुढे प्रार्थना.


Image Credit unsplash-logoEverton Vila