प्रत्येक जण पाऊसाचे  त्याच्या त्याच्या परीने वर्णन करत असतो.कुणी त्यावर कविता लिहितो तर कुणी त्यावर चक्क सुमधुर गीत बनवतो,कुणी त्याला कवटाळून बसतो तर कुणी त्यावर जीवापाड प्रेम करतो.ह्या जगात असा कोणीही नाही जो त्याच्या येण्याने सुखावून जात नाही.तो आहेच असा त्याची कीर्ती महान आहे.प्रत्येक जन त्याच्या पहिल्या बरसण्याच्या उत्कंठ प्रेमात असतो.

मी सुधा त्याच्या दरवर्षी नव्याने प्रेमात पडणारी एक.पाउस मला अतिशय प्रिय आहे.दरवर्षी तो कोसळतो पण दरवेळी असा नवखा भासतो.दरवर्षी एक आगळ वेगळ सुख देवून जातो जे सुख मनाच्या अंतरंगात अगदी खोलवर रुतून बसत.पाऊसची अशी सरसकट व्याख्याच आपण करू शकत नाही.माझ्या मते पाउस हा निस्वार्थी आहे.अगदी निस्वार्थी.त्याला खोटे मुखवटे नाहीत ना मनात कसला धूर्तपणा.तो बेभान होऊन बरसतो.त्यला पर्वा नाही कोणी साठवून ठेवण्याची न अट्टाहास बदल्या,पाण्याच्या टाकीत त्याला साठवून ठेवण्याचा त्याच आजन्म काम तेच बरसण्याच मग कोणी शिव्या श्राप देवो वा कोणी कविता लिहो तो त्याचा समर्थ.

पाउस माणसापेक्षा हि मोठ्या मनाचा आहे अगदी मोठ्या मनाचा.तो सर्वांच्या दारी एकसारखा बरसतो त्याला गरीब श्रीमंत असाही भेद  नाही.तो गरीबाच्या दारातही एवढाच पडणार जेवढा श्रीमंताच्याही.माणूस म्हणून आपण अनेक भेद,राग,मत्सर,घृणा इत्यादींच्या ओघात असतो मात्र पाउस तसा नाही.त्याकडून प्रामाणिकपणा आणि दुसर्यांसाठी जगण्याचा निस्वार्थ पण नक्की शिकावा.त्याच्या चार महिन्याच्या शाळेत भरभरून जगाव.आणि त्याचा चांगुलपणा नक्की आत्मसात करावा.

इतक स्वचंदी पाउसाच सुरेख  गाण सुरु असताना का आपण आपल्याच दाराच्या खिडक्या आपणहूनच बंद करायच्या का त्याला रोखायचं,का नाही झेलायचा तो सुंदर आवेग? विंडो सीट मिळावी म्हणून बस मध्ये धापक्या टाकत चढणारी मी नेहमीच त्या खिडकीतून पाउस झेलू पहायचे पण आता तस नाही अजिबात नाही आता पाउस मनसोक्त झेलणार आपल्याच माणसाचा हात पकडू दारे खिडक्या बंद हि नाही करणार तो आवेग अगदी मनमुरादपणे झेलणार.पाउसा तू खूप सुंदर आहेस आणि तुझ्यावर माझे
अलोट प्रेम आहे.Image Credit  
unsplash-logoErik Witsoe