निदान एकदा तरी तुला खूप बोलताना पहायचंय 
निदान त्या साठी तरी तुझी बडबड ऐकत तुझ्या समोर बसायचंय

निदान एकदा तरी तुला रागाने लालबुंद झालेल बघायचंय
निदान त्यासाठी तरी एखादा राग येणार काम करायचंय

एकदा तरी तुला वेगाने पळताना पहायचंय
निदान त्यासाठी तरी माझा वेग मला कमी करायचाय

निदान एकदा तरी तुझ्या सोबत सुसाट स्वारी करायचीये
निदान त्यासाठी तरी तुझ्या मागे घट्ट डबल सीट बसायचंय

निदान एकदा तरी तुला सुखाने झोपलेला पहायचंय
निदान त्यासाठी तरी मला रात्र भर जाग राहायचंय

निदान एकदा तरी तुला माझ्यासाठी ताटकळत ठेवायचंय 
निदान त्यासाठी तरी तुझ्या अवतीभवतीच कुठेतरी लपायचं

निदान एकदा तरी तुला चिंब पावसात भिजताना पहायचंय
निदान त्यासाठी तरी मला हि त्या गारा झेलायच्या आहेत

निदान एकदा तरी तुला कावराबावरा झालेला पहायचंय
निदान त्यासाठी तरी गर्दीत तुझा हाथ सोडून मला जायचं

निदान एकदा तरी तुला देवळात नतमस्तक झालेला पहायचंय
निदान त्यासाठी तरी मला हॉस्पिटल मध्ये जायचय

निदान एकदा एकदा तरी तुला खूप रडताना पहायचंय
निदान त्यासाठी मला खोट खोट मरायचंय(तुझ्या ओळीनी शेवट)