काळ्या ढगात दडलेल्या
अजाण माझ्या साजणा
वाट काढ अभाळूतुनी
आस लागली जिवाला
रिमझिम सरीत भासणाऱ्या
अबोल माझ्या साजणा
बोल हळूच गालातूनी
ऐकू येऊ दे श्रावणाला
डोंगर-नदीतून वाहणाऱ्या
संथ माझ्या साजणा
होवो शेवट तुझ्या प्रवासाचा
फक्त माझ्याच किनाऱ्याला
पाना-फुलात बहरणाऱ्या
सुहासिक माझ्या साजणा
दे उधळूनी गंध सारे
तृप्त होवूदे मनाला
कट्या-कुत्यात रुतलेल्या
जखमी माझ्या साजणा
घाव भरुनी काढीन मी
शोध मार्ग तू मोकळा
सागरात हरवलेल्या
भयाण माझ्या साजणा
लाव किनारी तू नाव
तेव्हाच सुख येईल नयनांना
- सहवासातल्या तुला
Image Credit
0 Comments