कधीतरी तू बेभान वारा बनावास
सुंदर फुलपाखरपरी सैरावैरा पळावास
दिशाहीन होऊन पळताना मात्र
तू माझ्याच पाशी येऊन विसावास

कधीतरी तू पावसाळी ढग बनावास
विशाल त्या अवकाशाच्या चौफेर पसरावास
तुझ्या दाटलेल्या अश्रूंचा बांध फूटताना मात्र
तू माझ्याच देहावर बेधुंद कोसळावास

कधीतरी तू रंगबेरंगी पतंग बनावास
उंचच उंच गगनामध्ये खेळ तुझा रंगावा
रंग प्रेमाचे उधळीताना मात्र
तुझ्या प्रेमाचा मांजा माझ्याच हाती असावा

कधीतरी तू गुलाबी थँडी बनावास
शीतल चंद्रप्रमाणे सर्वांना हवाहवासा वाटावास
गारवा तुझ्या अंतरीचा सर्वत्र भिनावा मात्र
तू मजपाशी येताना मायेची ऊब लेवून यावस

कधीतरी तू श्रेष्ठ श्रावण बनावास
साऱ्या सृष्टीवरी तुझा हिरवा सडा बरसावस
तुझे सौंदर्य  माधुर्य पाहताना नयनही अपुरे पडावे मात्र
तुझ्या रूपाचे वर्णन हे फक्त माझ्या मुखानेच व्हावे

कधीतरी तू ग्रीष्मातील गुलमोहर बनावास
प्रचंड उन्हातही तू अतिशय बहरावा
निरंतर उभं राहणे तुजकडून आम्ही शिकावे मात्र
तुझ्या शिकवणीचा पहिला विद्यार्थी तो मीच असावा

सहवासातल्या सुंदर  मोराला समर्पित
Image Credit 
unsplash-logoBill Fairs