किती दिवसापासून उदास आणि आशा सोडून दिलेल्या माझ्या मनाला एक जोरदार हर्षाचा झटका बसला.आणि मग कुठेतरी तुझ्यासाठी लिहिले गेलेले माझे शब्द ही आनंदाश्रु ढा लु लागले.
माझ्या शब्दांना आणि भावनांना ही तितक्याच न्याय मिळाला आणि ह्यासाठी मी आज तुला खूप मिस करतेय.

आज माझा आनंद गगनात मावेनासा झालाय.माझी ओंजळ देखील अपुरी पडतेय तुझ्या न्यायाच्या फुल पाकळ्या गोळा करताना.मी आज नक्की एक मेणबत्ती लावून तुला श्रद्धांजली वाहिन.कारण तुला खरच न्याय मिळाला. गचाळ न्यायव्यवस्थे विषयी मनात नेहमीच घृणा होती पण आज ती कुठेतरी वितळून माझं आपसूकच विश्वास वाढला आणि तुला इतक्या कमी दिवसात खूप शीघ्र पद्धतीने न्याय मिळाला ही गोष्टच मन आनंदाने भरून टाकते.तू तुझे कुटुंबीय व संपूर्ण देशच न्यायासाठी जुंपले असताना आज तुला मिळालेला न्याय खरच वाखानण्या जोगा आहे अस म्हणणं वावग ठरणार नाही.
पण आता ह्यापूढे कोणीही असा अपराध करताना नक्की एक वेळ विचार करेल हे ही तेवढेच सत्य.
व तसेच आता प्रत्येक बाप मुलीच्या हाती एक बंदूक कीव धारधार चाकू देऊ इच्छित आहे.ज्या देशात स्वतः स्वतःसाठी जोडीदार ही निवड मान्य नसणाऱ्या आता आपल्या भारतात मुलींच्या सुरक्षेसाठी सर्वापरिने प्रयत्न करणारे ते असंख्य बाप एकत्र आले आहेत व प्रत्येक जण आपल्या मुलीला तू घाबरु नकोस मनगटात ता कद असे पर्यंत लढ हवं तर मिरच्यांची पावडर ठेव कीव एखाद शस्त्र ठेव हेच वारंवार सांगत आहे.कुठेतरी एक छोटीशी बलात्कारासारख्या पाशवी कृत्याची वाचा फोडली जात आहे.आणि हे ही खूप जास्त महत्त्वाचं आहे.
पण,मला खरच तू जाण्याचं दुःख आजही तेवढच आहे.मी सुधा तुझ्याच वयाची तरुणी काठी जी माझी स्वप्न तिचं तुझीही असतील की जे माझे आई बाबा माझ्याबद्दल स्वप्ने रंगवत असतील तशीच तुझ्याही आईबाबांनी रंगवली असतील की.

तुला न्याय तर मिळाला पण त्यासाठी तुला तुझा जीव गमवावा लागला त्या यातना सोसाव्या लागल्या आणि तुझं अंत ह्या सर्व गोष्टी तशा अजुन मनात घर करून आहेत.
कदाचित अजुन किती मुली गेल्यावर सरकार सडेतोड निर्णय घेईल असा प्रश्न निर्माण होतो.तुला मिळालेला न्याय खरच आनंदी पूर्तीचा आहे पण तू गेल्याची खंत ही तेवढीच मनात कायम राहील. यापुढे कोणावर असा अत्याचार झाल्यास लोक शांत बसणार नाहीत हे ही तितकंच सत्य.
तू जिथे कुठे असशील तिथून नक्की हसत असशील.
आणि तुझं हे हसू तू असच कायम ठेवशील हीच माझी इच्छा.

आज एक मेणबत्ती मी नक्की लावेल पण आणि तुला मनापासून खरी न्यायाची श्रद्धांजली वाहिल.
तुझीच
आनंदी युवती
सोनल मांगेलाImage Credit unsplash-logoBen White