शाल चांदण्यांची पांघरुनी
तुजसाठी तारे ही लुकलुकती
विशाल आभाळातून गोड लाजुनी

हा दवबिंदू पडला पानावर आज
शुभ्र काया त्याची लेवूनी
तुजसाठी अळवावरचे पाणीही
तरल क्षणात गेले घरंगळुनी

हा प्राजक्ताचा सडा आज
कसा जमिनीवर कोसळे
तुजसाठी एक एक प्राजक्तफुल सुद्धा
कोमेजोस्तव सुगंध पसरवे

हा सर्वगुणसंपन्न मोर आज
जमिनीवर थुईथुई नाचतो
तुजसाठी बहारदार पिसाराही
तो कसा अभिमानाने फुलवितो

सहवासातल्या सुंदर मोराला समर्पितImage Credit unsplash-logoVivek Doshi