असावा एखादा किनारा
जिथे वाळूत तुझे नाव कोरावे
असावी एखादी नदी
जिच्यात तू खळ खळून वहावे

असाव्या श्रावणधारा
ज्यात तू मनसोक्त नहावे
असावित छोटी पण सुंदर स्वप्ने
ज्यात तू आणि मी असावे

असावा एक खांदा आधाराचा
ज्यावर डोकं ठेऊन हलकेच विसावे
असावी मिठी ओतप्रेत प्रेमाची
ज्यात जग विसरून गढून जावे

असावा देह भरगच्च असा
ज्यात मी तुला बिलगून बसावे
असावे अश्रू गोड चवीचे
ज्यात तुझी सतत आठवण असावी

असावे ते दोन  हात आधाराचे
ज्यात हात गुंफवून कायमचे झोपून जावे

सहवासातल्या सुंदर मोराला समर्पित


Image Credit 
unsplash-logoBrooke Cagle