काही थोडेच दिवस शिल्लक राहिले असताना हे हि वर्ष आता लगेच संपून जाणार आहे. पण ,खरंच विश्वास बसत नाही कि काल परवाच सुरु झालेले हे  २०१९ आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपले आहे. असा सर सकट १२ महिन्याचा कालावधी कसा शताब्दी एक्सप्रेस नुसार धावत निघून गेला कुठलाही स्टॉप न घेता.
 असो.. नव्या २०२० मध्ये सुरुवातीचे काही दिवस २०१९ लिहून मग ते खोडन्यातच जातील.आणि मग ते सर्वाना same to  you बोलण्यात काही काळ निघून जाईल आणि  मग २०२० ची अगदी सवय होऊन जाईल. प्रत्येक वर्षा अखेरीस  आयुष्यातलं अजून एक वर्ष कमी झाल्याची खंत वाटते मला दरवेळी. काही नवी ध्येय ठरवते पण तशी जशी च्या तशी अमलात नक्कीच येत नाही .
शाळेत असताना २०२० पर्यंत भारत विकसित देश गणला जाणार हे आमचे नागरिकशास्राचे सर कसे अभिमानाने ठासून सांगत असल्याचे आजही मला आठवते. आणि मला सुद्धा एक वेगळाच जोश एक वेगळीच उर्मी दाटून येते. म्हणजे तेव्हा मी कल्पनाहि केलेली कि आपल्या आजूबाजूला पण स्वच्छता असेल सगळं कस पॉश दिसेल पण माझ्या आशेला विरजण लागल्यागत झालाय आणि माझा भारत सुजलाम सुफलाम विश्वात शोभूनी राहणे हे हि फक्त त्या कवितांमध्येच राहिलाय.आता त्या कविता सुद्धा नामशेष झाल्याच्या पाहायला मिळतात. एका अहवालाने दिलेल्या माहितीनुसार विकसनशील भारताला त्या यादीतूनही काढल्याचं समजतंय,  कारण माझ्या प्रिय देशात असलेली अप्रिय  कामाची ,विश्वासाची,लाचखोरीची , रंगाची, धर्माची, जातीची , सदैव वळवळणारी कधीच स्वस्थ न बसणारी मोठी  कीड.
राजकारण्यांची पातळी किती सौम्य आणि पारदर्शक आहे आणि जनतेसाठी ते किती काय करू शकतात हे हि तेवढंच जास्त कळलं मला राष्ट्रपती राजवट लागल्यावर. बेस्ट तशी स्वस्त झाली आणि कांदे महागले . निसर्गाचा आक्राळ विक्राळ प्रताप मी ह्या वर्षी अगदी जवळून पाहिला आणि ऐन दिवाळीत सुद्धा पावसामध्ये रांगोळी काढण्याच्या पंचायतीवर मला हसू कि रडू झाले. पण मी ह्या दोन्हीपैकी काहीच केले नाही कारण मी फक्त पावसाला अपशब्द बोलले. एरवी दुष्काळाने करपून जाणारी शेते ह्यावेळी सुकाळाने मरण पावली एवढंच त्या शेतकऱ्यांचं दुर्दैव म्हणावं लागेल. आणि नियतीसमोर कोणाचं काही चालू शकत नाही हे पुन्हा खऱ्या अर्थाने स्पष्ट  झालं. आमचं फेसबुक आणि व्हाट्स अँप सुद्धा एक पायरी पुढे सरकत अजून पुढे किती बदल घडवून आणतील हेच बघायचं राहिलाय आता.
गेल्यावर्षी झालेल्या परेल पुलाच्या अपघातानंतर लोक शिस्तीत रांगेत लोकल मध्ये चढतील असं वाटलं होत मात्र पण तसे होण्याची चिन्ह अजून नाहीत आमच्या कोशात. तरुण पोरांडी मात्र लय खुश दिसतात आजकाल टिक टॉक वर असकाही भरतील कि जणू सर्व चित्रपटातील मंडळी आता निवृत्त होण्याचं दिसून येत. आणि त्यात तो कबऱ्या ? अहो कबीर सिंग .. नुसताच पोरांना दाढ्या मिश्या वाढवून व्यसनासाठी  उत्स्फूर्त करणारा करोडोचा धंदा कसाकाय करू शकतो? माझा देश खरंच महान आहे. इथे तुमच्या पंतप्रधानाला सांगावं लागत कि बाबानो भारत कचरामुक्त करूया स्वछ करूयात. आणि मग आम्ही प्रयत्न हि करतो त्यासाठी पण माझा देश अस्वच्छ च आहे .
बेरोजगारीची तर हद्दच पार झाली कारण आपल्या आज्या आजोबांच्या अडाणी कुटुंब हींन  नियोजन पद्धतीमुळे लोकसंख्येवर प्रचंड ताण पडणार असून पुढील पाच वर्षात आर्थिक महासत्ता होणार का माहित नाही पण जास्त लोकसंख्येचा देश बनेल हे हि तेवढंच भयाण वास्तव. पुन्हा नवे इंजिनियर बनतील नोकरीसाठी वणवण फिरतील आणि  पुन्हा डॉक्टर आरक्षणसाठी संपाला पेटतील.लोकलची संख्या तशीच राहून लोकसंख्या मात्र कमालीची वाढेल राहील आणि पुन्हा मग तीच रोजची भांडणे वादविवाद चालत राहतील. बिनकामाच्या प्रश्नावरून लोक जाळपोळ करतील.नेटपेक महाग झाले तरीही आम्ही झुरत ते वापरूच पण कांदे महागले तर लगेच सरकारला दोष देऊ.त्या सेल्फी मंडळी थोबाड हि तशीच नाक मुरडत डोळे  वटारत फोटो काढतील. गुटके खाणारी मंडळी मात्र हल्लीच साफ केलेल्या भिंती पुन्हा रंगवत एक मोठा सुस्कारा सोडतील.पुन्हा आय पी एल साठी बोली लावली जाऊन बाहेरचे खेळाडू सुद्धा गरीब भारतात येऊन करोडो कमावून आपल्या मायदेशी परततील. अनेक बजेट बनतील , मोडतील खूप काही होईल मात्र प्रगती तशीच जैसे थे. 
पण आम्हाला आशा आहे. नव स्वप्न आहे. नव्या गोष्टी व नवी कार्यपद्धती व तसेच नवे सुधारित कायदे ह्यांचहि स्वप्न आहे. तसे ह्यावर्षी जरी भारत आर्थिक मंदीत घसरला असला तरी पुलवामा नंतर केलेली सर्जिकल सट्राईक खरच  कौतुकास्पद होती.भारताच्या स्वर्गाची कलाम ३७० मधून मिळालेली मुक्ती म्हणजे जग जिंकल्यासारखं च आहे जणू. आयोध्येचा निकालही सर्वाना खुश करून गेला. डॉक्टर  प्रियांका  ह्यांना शीघ्र पद्धतीने मिळालेला न्यायचं  खरंच कौतुक करू तेवढं कमीच . माझ्या इसरो ने बनवलेले मंगळयान आकाशाला भेदून आरपार मंगळाच्या कक्षेत तर गेलं भले संपर्क तुटला असावं पण आशा अजून जिवंत आहेत. आणि शेवटपर्यंत राहतील.
नवं वर्ष काय देईल हे माहित नाही आणि जाणून हि घ्यायचं नाही . पण निश्चितच माझा भारत सुजलाम सुफलाम कडे वाटचाल करून आर्थिक महासत्तेकडे हळूहळू कूच करत पुढे जाऊदे इतकीच इच्छा आणि मागणी.


Image Credit unsplash-logoNordWood Themes